तीन मंत्र्यांच्या बैठकीला होते उपस्थित

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर यांचा कोरोनाचा अहवाल सोमवारी पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. यावेळी मनपा आयुक्त या तीनही मंत्र्यांच्या अगदी जवळ उभे होते. आयुक्तांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे अधिकारी हादरून गेले आहेत. तर बैठकीला उपस्थित असलेले करमाळाचे आमदार संजय शिंदे यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आले आहे. तसेच बैठकीला उपस्थित असलेले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आदींनासुद्धा होम क्वारंर्टान व्हावे लागेल असे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा