पुणे : शहरात जुन महिन्याच्या अखेर दररोज पाचशे ते सहाशेच्या संख्येने कोरोनाग्रस्तंच्या संख्येत वाढ होत आहे. सोमवारी पुन्हा 617 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 618 वर पोहोचली आहे. दिवसभरात 482 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 हजार 742 वर पोहचली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

शहरात कोरोनाच्या तपासण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. सोमवारी तब्बल 4 हजार 38 जणांची स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. विविध रुग्णालयात एकूण 6 हजार 195 रुग्ण उपचार घेत आहेत. मागील चोविस तासात 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. काल 4 हजार 38 जणांच्या कोरोनाची तपासणी करण्यात आली. 617 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ससून रूग्णालयात 18, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये 365 तर खासगी रुग्णालयांमध्ये 234 रुग्ण दाखल आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 333 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील 61 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 272 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

शहरातील मृतांची संख्या 618 वर पोहोचली असून आजपर्यत मृत्यू झालेल्या रुग्णांना निमोनिया, उच्च रक्तदाब, हृद्य विकार, मधुमेह, कर्करोग आदी विकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिवसभरात एकूण 482 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ते घरी परतले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील 326 रुग्ण, ससूनमधील 24 तर खासगी रुग्णालयांमधील 132 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 9 हजार 929 झाली आहे. तर 6 हजार 195 रुग्ण उपचार घेत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा