नव्याने ३९ जणांची वाढ

सातारा, (वार्ताहर) : जिल्ह्यातला धोका दिवसेंदिवस वाढत आहे. हा आठवडा तर प्रचंड वेगाने कोरोना बाधित असल्याचा आकडा मोठा असल्याचे दाखवत आहे. सोमवारी पुन्हा त्यात 39 ची भर पडली असल्याने एकूण आकडा 1 हजार 12 इतका वाढला आहे. सातारा जिल्हा महाराष्ट्रातील पहिल्या 10 जिल्ह्यात गेला असल्याचे स्पष्ट होत आहे. विविध रुग्णालयांत व कोरोना केअर सेंअर मध्ये उपचार घेत असलेल्या जिल्ह्यातील 39 नागरिकांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे, जावली तालुक्यातील रामवाडी, आखेगनी, बिरामनेवाडी, कराड तालुक्यातील गोळेश्वर, चचेगाव, उब्रंज, मसूर, पाटण तालुक्यातील सांघवड, फलटण तालुक्यातील जिंती, रविवार पेठ, अलगुडेवाडी, वाई तालुक्यातील वाघजाईवाडी, पसरणी, कवठे, सातारा तालुक्यातील नागठाणे, कोरेगाव तालुक्यातील चौधरवाडी, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा