वॉशिंग्टन : चीनकडून भारताच्या सीमांमध्ये होत असलेल्या घुसखोरीवर आता अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, चीनला भारताच्या हद्दीत घुसखोरी न करण्याचा इशाराही दिला आहे. चीनच्या सैन्यांकडून वारंवार भारताच्या हद्दीत घुसखोरी केली जात आहे. भारताकडूनही या घुसखोरीला योग्य उत्तर दिले जात आहे. आता अमेरिकाही भारतासोबत आहे. या संदर्भात व्हाइट हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे, चीन भारतासह सर्व शेजारी देशांमध्ये चिथावणीखोर लष्करी कारवाया करीत आहे. चिनी समुद्र, तैवान सामुद्रधुनी आणि भारत-चीन सीमेवरील घुसखोरीच्या कृत्यांनी शेजारील देशांना चीन घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहे. तत्पूर्वी, अमेरिकी राजदूतांनीही चीन भारतीय सीमांचे उल्लंघन करीत असून तो दिवसेंदिवस इतर देशांसाठी धोकादायक बनत असल्याची टीका केली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा