पुणे : कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. मात्र, दररोज सायंकाळी सात ते दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत शहरात संचारबंदी कायम असणार आहे. येत्या ३१ मे पर्यंत हा नियम पुण्यात लागू करण्यात आला आहे. याबाबत सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी गुरूवारी रात्री उशिरा आदेश दिले. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असणार्‍या शहरांमध्ये संचारबंदीचे?आदेश कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करून दुकाने व इतर व्यवसाय सुरूच ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये मास्क व सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिगचे पालन करणे अनिवार्य आहे.

मात्र, शहरात अनेक ठिकाणी सायंकाळी अनेक नागरीक रस्त्यांवर वाहने घेऊऩ उतरत असून, काही ठिकाणी गर्दीने फिरताना दिसत आहेत. त्यामुळे सायंकाळी सात ते दुसर्‍या दिवशी सकाळी सात या वेळेत रस्ते, गल्ली, बोळा, सोसायटीचा अंतर्गत भाग यामध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. पालिका क्षेत्र, पुणे व खडकी छावणी क्षेत्रात हे आदेश लागू राहणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी आदेशात नमूद केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा