१४ जणांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. शुक्रवारी तब्बल 291 नव्या रुग्णांची भर पडली. तर, 14 जणांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे 189 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

शहरात 1,735 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 291 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यापैकी महापालिकेच्या नायडू रुग्णालय व विलगीकरण कक्षात 247, ससून रुग्णालयात 9, तर खाजगी रुग्णलयात 35 जणांना उपचारासाठी दाखल केले आहे.

सध्या शहरात विविध रुग्णालयात 1,786 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यापैकी 168 रूग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर 49 जण व्हेंटिलेटरवर आहेत. काल 14 जणांचा मृत्यू झाला. यापैकी सात जण ससूनमध्ये, दोघे नायडू ?रुग्णालयात तर उर्वरित पाच जण खाजगी रूग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कोरोनाव्यतिरिक्तही अन्यही आजार होते.

पुण्यात 9 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. आता कोरोना रुग्णांची संख्या 4,398 वर पोहोचली आहे. यापैकी नायडू व खाजगी रुग्णालयात 3 हजार 977 तर ससून रुग्णालयात 421 जण दाखल झाले होते. यापैकी 2,371 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

सध्या 1,134 कोरोनाबाधित रुग्ण नायडू हॉस्पिटलसह अन्य आयसोलेशन सेंटरमध्ये, 154 जण ससूनमध्ये, तर 498 रुग्ण हे विविध खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत.

कोंढवा येथील 33 वर्षीय व्यक्ती, पर्वती येथील 70 व 62 वर्षीय व्यक्ती, गंज पेठेतील 72 वर्षीय महिला, घोरपडी येथील 45 वर्षीय महिला, नाना पेठेतील 48 वर्षीय व्यक्ती, तर केशव नगर येथील 56 वर्षीय व्यक्तीचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. नाना पेठेतील 40 वर्षीय महिला, पर्वती येथील 70 वर्षीय व्यक्ती, कॅम्प परिसरातील 69 वर्षीय महिला, येरवडा येथील 90 वर्षीय व्यक्ती, ?भवानी पेठेतील 93 वर्षीय व्यक्ती, तर येरवडा येथील 75 वर्षीय व्यक्तीचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णांना निमोनिया, उच्चरक्तदाब, श्वसनाचा विकार, हृदयाचा व किडनीचा आजार, मधुमेह, लठ्ठपणा आदी आजारांसह कोरोनाची लागण झाली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा