सोमवारपासून विमान सेवा सुरू

पुणे : कोरोनामुळे सुमारे दोन महिन्यांपासून शहरातून विमानांची उड्डाणे थांबली होती. मात्र येत्या सोमवारपासून देशातंर्गत विमान सेवा सुरू होत आहे. त्यामुळे पुण्यातून दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, जयपूर, अहमदाबाद, नागपूर आणि नाशिक या शहरांसाठी विमाने उड्डाण करणार आहेत.

देशातील महत्त्वाचे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. शिक्षण, संशोधन, पर्यटन आदीसाठी देशातील विविध शहरातून लोक पुण्यात येतात तसेच पुण्यातून इतरत्र जातात. आयटी आणि औद्योगिक क्षेत्रामुळे शहरात येणार्‍या विमान प्रवाशांची संख्याही दर वर्षी वाढत आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळावरून रोज उड्डाण करणार्‍या विमानांची संख्याही मोठी आहे. याच विमानतळावरून 25 मे पासून विमाने उड्डाण भरणार आहेत. विमानतळ प्रशासनाने 25 ते 31 मे या कालावधी विमान उड्डाणाचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. विमान सेवा सुरू करण्याची घोषणा करताच विविध विमान कंपन्यांनी तिकीट बुकिंग सुरू केले होते. स्पाइसजेट, इंडिगो आणि एअर इंडिया या कंपन्यांचे दिल्ली मुंबई मार्गाची संपूर्ण तिकीट विक्री एका तासात झाली आहे.

डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशनने विमान कंपन्यांना विमानाचे वेळापत्रक सादर केले आहे. त्यानुसार कंपन्यांनी नियोजन केले आहे. दरम्यान, विमान सेवा सुरू करण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासन सज्ज असल्याचे विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले. उन्हाळी हंगामात लोहगाव विमानतळावरून सुमारे दोनशेपेक्षा अधिक विमानांची ये-जा होते. मात्र, सध्या लॉकडाउनमुळे मागणी कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर एकूण क्षमतेच्या केवळ 30 टक्केच सेवा दिली जाणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा