पुणे : महावितरणच्या वेबपोर्टल व मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविणार्‍या वीजग्राहकांना त्यांनी प्रत्यक्षात केलेल्या वीजवापरानुसार अचूक वीजबिल देण्यात येत आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच चालू रिडींग पाठविणार्‍या ग्राहकांना एप्रिल महिन्याच्या बिलातील सरासरी युनिट व रक्कम भरली असल्यास त्याचेही समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी संबंधीत वीजबिलामध्ये नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे परिमंडलातील एकूण 69 हजार 912 वीजग्राहकांनी एप्रिलमध्ये दिलेल्या मुदतीत स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविले होते. या सर्वांना एप्रिल महिन्याचे प्रत्यक्ष वीजवापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र ज्या वीजग्राहकांनी एप्रिलमध्ये रिंडीग न पाठवता मे महिन्यात चालू मीटर रिडींग पाठविले त्यांना एप्रिल व मे महिन्यांचे प्रत्यक्ष वीजवापरानुसार वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणची www.mahadiscom.in संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रिडींगचे फोटो पाठवून स्वतः रिडींग घेण्याची सोय उपलब्ध आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा