मुंबई, (प्रतिनिधी) : कोरोनाचा मुकाबला करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. कोरोनाचे देशात सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात असून, आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आहे, असा आरोप करत भाजपने शुक्रवारी राज्यभरात ‘माझे अंगण, रणांगण’, अशी घोषणा देत ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन केले. तर महाराष्ट्र कोरोना महामारीच्या संकटाशी लढत असताना सत्तेकरिता हपापलेल्या भाजपचा महाराष्ट्राचे राजकीय रणांगण करण्याचा प्रयत्न चालवला असल्याची टीका काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. भाजपच्या ’महाराष्ट्र वाचवा’ला प्रत्युत्तर देणारा आघाडीचा ’ञ्च्महाराष्ट्रद्रोही बीजेपी’ या हॅशटॅगला समाजमाध्यमांवर चांगलाच प्रतिसाद मिळाला.

राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने धडाडीने पावले टाकून प्रभावी उपाययोजना करावी, तसेच रोजंदारी कामगार, बारा बलुतेदार आणि शेतकरी यांच्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पन्नास हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज जाहीर करावे, या दोन प्रमुख मागण्यांसाठी भाजपने काल राज्यात आंदोलन केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत, तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे आंदोलन केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा