नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1,18,447 वर पोहोचली. तर, बळींची संख्या 3,583 वर गेली. मागच्या 24 तासांत 6,088 नव्या रुग्णांची भर पडली. तर, 148 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत, 48,533 जण बरे होऊन घरी परतले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 40.97 टक्के इतके झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या दोन दिवसांपासून देशात दररोज पाच हजार रुग्णांची भर पडत आहे. देशात सर्वाधिक 44 हजार 582 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर, 1517 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी 2940 नवे रुग्ण आढळले. तर 63 जणांचा मृत्यू झाला. एकट्या मुंबईतील रुग्ण संख्या 27,251 झाली आहे. तामिळनाडूत 13,967, गुजरात 12,905, दिल्ली 11,659, राजस्तान 6,277 तर मध्य प्रदेशात 5981 रुग्ण आहेत. देशात पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर 45 दिवसांनी म्हणजे 15 मार्च रोजी बाधितांची संख्या 100 वर पोहोचली. 29 मार्च रोजी रुग्ण संख्या एक हजारांवर तर 13 एप्रिल रोजी 10 हजारांवर पोहोचली. 6 मे रोजी रुग्ण संख्या 50 हजारांवर तर 19 मे रोजी एक लाखाचा टप्पा ओलांडला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा