सोलापूर, (वार्ताहर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक लोक ग्रामीण भागात परतले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागातील 22 लाख 24 हजार 672 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी 121 लोकांमध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास, खोकल्यासह सारीसदृश प्राथमिक लक्षणे आढळली असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा परिषदेतर्फे सांगण्यात आले.

सोलापूर शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. शहरामुळे ग्रामीण भागात आतापर्यंत सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगली आहे. आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचार्‍यांचे पथक घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण करीत आहे.

१५ मेपर्यंत आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील 22 लाख 24 हजार लोकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये 121 जणांना ताप, श्वास घेण्यासाठी त्रास, खोकला अशी लक्षणे आढळली आहेत. त्यांना त्वरित उपचारासाठी दाखल होण्याच्या सूचना दिल्या असून, स्थानिक आरोग्य कर्मचारी त्यांच्यासह, कुटुंबातील सदस्यांच्या तब्येतीची नियमित विचारपूस करीत आहेत.सोलापूर ग्रामीणमध्ये 2270 जणांना फक्त खोकला तर 2084 जणांना फक्त ताप तसेच 1149 जणांना श्वास घेण्यास त्रास व खोकला व ताप असलेले 250 रुग्ण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहेत.

तालुकानिहाय सारीसदृश रुग्ण

अक्कलकोट : 12, बार्शी : 11
करमाळा : 42, माढा : 11 माळशिरस : 9, मंगळवेढा : 4
मोहोळ : 3, पंढरपूर : 10
सांगोला : 12,
उत्तर सोलापूर : 4
दक्षिण सोलापूर : 3

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा