सोलापूर : कोरोना आणि टाळेबंदीमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरवातीला सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या.आता अंतिम वर्ष सोडून इतर वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत.त्यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर करण्याकरिता अंतिम वर्ष सोडून इतर वर्षातील विद्यार्थ्यांनी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा,असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सनदी लेखापाल श्रेणीक शाह यांनी केले.

यासाठी गेल्या २० मे २०२० रोजी विद्यापीठांतर्गत सर्व प्राचार्य, विभागीय संचालक तसेच संस्थाप्रमुख यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरसद्वारे बैठक झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्वे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे अंतीम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांचा २०२० च्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल हा ५० टक्के अंतर्गत मूल्यमापन व ५० टक्के मागील परिक्षेतील सादरीकरणावर लावणार आहे. त्यानुसार अंतर्गत मूल्यमापनापैकी उर्वरीत २० गुणांसाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना असाईंमेंट देणार आहे व त्यानुसार २० टक्क्यांपैकी प्राप्त गुण महाविद्यालये विद्यापीठाकडे सादर करणार आहेत. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. जेणेकरुन सदर असाईंमेटचे २० पैकी गुण त्यांना प्राप्त करता येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शहा यांनी म्हटले आहे. तसेच महाविद्यालयांनी देखील आपापल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती द्यावी, असेही विद्यापीठाने म्हटले आहे.याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव आपले २०२० च्या उन्हाळी सत्र परीक्षेचे फार्म्स (परिक्षेचे अर्ज) भरले नसतील, त्यांनी आपले फाॕर्म्स आॕनलाईन पद्धतीने अथवा आपापल्या महाविद्यालयामार्फत दि. २५ जून २०२० पर्यंत दाखल करावेत, असेही आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा