पुणे : कोरोनामुळे 1 ऑगस्टपासून महाविद्यालयांचे नवीन वर्ष सुरू करण्याचे नियोजन असले तरी डेक्कन एज्युकेशन सोसायटीने (डीईएस) पुणे, मुंबई, सांगली येथील सर्व महाविद्यालये 1 जूनपासून ऑनलाईन पद्धती सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तर नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने यासंदर्भात माहिती देण्यासाठी झूमद्वारे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी डॉ. कुंटे यांनी ही माहिती दिली. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, डीईएसच्या स्थानीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व विधी महाविद्यालयाचे नितीन आपटे, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यावेळी उपस्थित होत्या. डॉ. कुंटे म्हणाले, संस्थेच्या शाळांमधील दहावीचे, कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीचे वर्ग ऑनलाइन सुरू झाले असून, बुधवारपासून नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाचे कामकाजही ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. कोरोना व लॉकडाउनमुळे सर्वच कामकाज ठप्प झाल्याचे चित्र होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा