पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातील चिंचवड स्टेशन येथील दाट लोकवस्ती असलेल्या आनंदनगर झोपडपट्टीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत. आनंदनगर झोपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहे. हे रोखण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.शहर कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. दररोज शहराच्या विविध भागात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. शहरातील कोरोनाच्या रुग्णांनी दोनशेचा आकडा पार केला आहे. १० मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील २५२ जणांना कोरोनाची लागण झाली. शहरात अनेक भागात लहान मोठ्या झोपडपट्ट्या आहेत. दाटीवाटीने लोक तेथे वास्तव्यास आहेत. अशा अनेक ठिकाणी कोरोनाचा शिरकाव होऊन तो वाढताना दिसत आहे. चिंचवड स्टेशन येथील आनंदनगरमधील झोपडपट्टीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. मागील काही दिवसांपासून या झोपडपट्टीत दररोज नवीन रुग्ण सापडत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा