पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान कराची विमानतळाजवळील निवासी भागात कोसळले. या विमानात एकूण ९० प्रवासी आणि आठ कर्मचारी असल्याची माहिती असून लाहोरहून कराचीकडे हे विमान येत होते. या अपघाताचे कारण अद्याप समोर आले नाही.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी या घटनेला दुजोरा दिला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, जीवितहानीबाबतची माहिती अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही. या घटनेचा एका व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात एका इमारतीजवळ धुराचे लोळ उठल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा