नवी दिल्ली : कोरोनाशी लढा देण्यासाठी आता भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) आपल्या खेळाडूंसाठी कडक नियमावली सादर केली आहे. टाळेबंदीच्या काळात हस्तांदोलन करणे, गळाभेट घेणे, थुंकणे तसेच केशकर्तनालयात जाण्यास खेळाडूंना सक्त मनाई करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करताना सरावासाठी क्रीडा संकुले आणि मैदाने खुली करण्याचा निर्णय सुनावला. त्यानंतर ‘एएफआय’ने शिबिरासाठी सराव करताना स्वत:ची कार्यप्रणाली तयार केली आहे. त्यानुसार, खेळाडूंनी सराव करताना सामाजिक अंतराच्या नियमांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे, असे ‘एएफआय’ने म्हटले आहे.

‘एएफआय’च्या सूचना खालीलप्रमाणे

सर्दी, खोकला, थकवा, श्वास घेण्यास अडचणी येणे अशी तापाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे.
कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास, खेळाडूंनी त्वरित मुख्य किंवा साहाय्यक प्रशिक्षक तसेच उच्च कामगिरी संचालकांशी संपर्क साधावा.
कायम सामाजिक अंतर ठेवावे.
खेळाडू तसेच प्रशिक्षकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट घेणे टाळावे, शिंकताना नाक आणि तोंड पूर्णपणे झाकावे, मैदानावर थुंकू नये.
केशकर्तनालय, शॉपिंग मॉल तसेच ब्युटी पार्लरमध्ये जाऊ नये.
बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे अथवा मागवणे टाळावे. समूहाने सराव करणे टाळावे.
स्वत:ची पाण्याची बाटली, सॅनिटायझर आणि रुमाल हे जवळ बाळगावे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा