आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू

सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी 488 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 35 झाली आहे. आत्तापर्यंत 5217 जणांची कोरोनाचाचणी झाली आहे. यातील 5014 अहवाल प्राप्त झाले. यात 4526 निगेटिव्ह तर 488 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. एकूण 203 अहवाल प्रलंबित आहेत. गुरुवारी एका दिवसात 183 अहवाल प्राप्त झाले. यात 165 निगेटिव्ह तर 18 पॉझिटिव्ह अहवाल आहेत. यात 10 पुरूष 8 महिलांचा समावेश आहे. मृतांची संख्या 35 झाली असून यात 19 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे.

आतापर्यंत रुग्णालयातून बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या 210 इतकी झाली आहे. तर 244 जणांवर उपचार सुरू आहेत. गुरूवारी मृत पावलेली व्यक्ती उत्तर सदर बझार लष्कर येथील 72 वर्षीय पुरूष आहे. 17 मे रोजी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते बुधवारी मृत्यू झाला.

गुरूवारी जे रूग्ण मिळून आले त्यांची माहिती पुढीलप्रमाणे – अशोक चौक 1 महिला, न्यू पाच्छा पेठ 1 पुरूष, 2 महिला, उत्तर कसबा पत्रा तालीम 1 पुरूष, कुर्बान हुसेन नगर 1 पुरूष, केशव नगर झोपडपट्टी 1 महिला, धुम्मा वस्तीभवानी पेठ 1 पुरूष, निलम नगर 1 पुरूष, सिव्हील हॉस्पिटल क्वार्टर 1 महिला, बेगम पेठ 1 पुरूष, बुधवार पेठ 1 महिला, न्यू बुधवार पेठ 1 पुरूष, कुमार स्वामी नगर 1 महिला, रेल्वे लाईन 1 पुरूष, कुमठा नाका 1 पुरूष, बाळीवेस 1 पुरूष, पाच्छा पेठ 1 महिला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा