जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे जवानांची दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली. या चकमकीनंतर दक्षिण काश्मीर परिसरात राबवलेल्या शोध मोहीमेत लोलाब जंगल भागातून,लष्कर-ए-तय्यबाच्या तीन दहशतवाद्यांना पकडण्यात जम्मू-काश्मीर पोलीस व २८-राष्ट्रीय रायफलच्या जवानांना यश आले.

पकडलेले हे तिन्ही दहशतवादी नुकतेच लश्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेशी जोडल्या गेले होते. यातील दोघांची ओळख पटली असून झाकीर अहमद भट आणि आबिद हुसेन वानी अशी त्यांची नावे आहेत.

या आधी जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे ३ मे रोजी झालेल्या चकमकीत ठार झालेल्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक जण लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर हैदर होता. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालकानी यासंदर्भातील माहिती वृत्तसंस्थेला दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा