नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशांतर्गत हवाई वाहतुकीस परवानगी दिली आहे. येत्या २५ मेपासून देशांतर्गत हवाई वाहतूक टप्प्या-टप्प्याने सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बुधवारी दिली. विमान कंपन्यांनी उड्डाणासाठी तयार राहावे; विमानतळेही सज्ज ठेवावीत, असे ट्विट पुरी यांनी केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशाच्या सीमा बंद करण्याबरोबरच राज्यांच्या सीमाही बंद केल्या होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीबरोबर देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता.

दररोज २०० रेल्वे

नवी दिल्ली : देशभरात १ जून पासून दररोज २०० विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. या रेल्वे गाड्यांसाठी लवकरच ऑनलाइन आरक्षण सुरू होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या सर्व रेल्वे गाड्या विना वातानुकूल असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या रेल्वे गाड्यांसाठीही विशेष श्रमिक रेल्वेचे नियम लागू असतील. प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल. प्रवाशांना वेळेपूर्वीच स्थानकात उपस्थित राहावे लागेल. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग स्वतंत्र असेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा