नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या १,०६,७५० वर पोहोचली आहे. तर, बळींची संख्या ३,३०३ वर गेली. मागच्या २४ तासांत ५,६११ नवे रुग्ण सापडले. तर,१४० जणांचा मृत्यू झाला. सध्या ६१,१४९ जणांवर उपचार सुरू असून ४२,२९८ जण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ३९.६२ वर पोहोचले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिली.

मागच्या २४ तासांत महाराष्ट्रात ७६, गुजरात २५, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ६, राजस्तान आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी ५, तामिळनाडू कर्नाटक आणि तेलंगणात प्रत्येकी ३, आंध्र प्रदेश, आसाम, जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्येकी २, ओडिशा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत.राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३९,२९७ गेली आहे. बुधवारी २२५० नवी प्रकरणे समोर आली. काल ६७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले.आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा