२२ मे रोजी स्वीकारणार पदभार

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे २२ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारतील.डॉ. हर्षवर्धन हे कोविड -१९ विरुद्ध भारतातील युद्धाच्या अग्रगण्य लोकांपैकी एक आहेत.डॉ. हर्षवर्धन यांची नियुक्ती जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्या जागी होत आहे. नाकातानी हे डब्ल्यूएचओच्या ३४ सदस्यीय मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत

जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत भारताच्या वतीने नामांकित केलेले डॉ. हर्षवर्धन यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर मंगळवारी १९ मे रोजी १९४ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर, डॉ. हर्षवर्धन हे पदभार स्वीकारणे करणे ही केवळ औपचारिकता होती. मे पासून सुरू होणार्‍या ३ वर्षाच्या कार्यकाळात भारत कार्यकारी मंडळावर राहील, असेही यावेळी सर्वानुमते निश्चित झाले.

डॉ. हर्षवर्धन यांची निवड २२ मे रोजी कार्यकारी मंडळाच्या बैठकीत केली जाईल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रादेशिक गटांमधील अध्यक्ष पद एक वर्षासाठी रोटेशन तत्त्वावर दिले जाते. शुक्रवारी (२२ मे) सुरू होत असलेल्या पहिल्या वर्षासाठी भारताचे उमेदवार कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष असतील असा निर्णय गेल्या वर्षीच झाला होता.

डॉ. हर्षवर्धन यांना दिलेली ही पूर्णवेळ जबाबदारी नाही आणि आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना फक्त कार्यकारी मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवावे लागणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या कार्यकारी मंडळाचे ३४ सदस्य असतील. ते सर्व तांत्रिकदृष्ट्या आरोग्य क्षेत्रातील असतील. या मंडळाच्या वर्षातून कमीतकमी दोनदा बैठका होतात. तर, मुख्य बैठक जानेवारी महिन्यात होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा