सोलापूर : सोलापूरात सोमवारी आणखी ५० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. यात ३४ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झला. यामुळे बळींची संख्या २९ वर पोहोचली. सोलापुरात आतापर्यंत ४,६६३ व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी ४,४१८ अहवाल प्राप्त झाले. यात ३,९८३ निगेटिव्ह, तर ४३५ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. काल ३१९ अहवाल प्राप्त झाले. यात २६९ निगेटिव्ह, तर ५० पॉझिटिव्ह आहे. सात रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर २४१ जण उपचार घेत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा