विजय चव्हाण

पुणे : शंभर वर्षांपूर्वी पुण्यात प्लेगची साथ आली होती, या साथीला महामारी हा प्रतिशब्द वापरला गेला होता. या महामारीमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले. याची पुनरावृत्ती बरोबर १०० वर्षांनी झाली?आहे! प्लेग आता नसला तरी ‘कोरोना’च्या साथीने पुण्यात थैमान घातले आहे. पुण्यात १८९६ ते १९२० या काळात प्लेगची साथ आली होती. संसर्गातून होणार्‍या या रोगामुळे पुण्यात दररोज १५० ते २०० नागरिक मृत्युमुखी पडत होते. कोरोनामुळे प्लेगच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

‘केसरी’ने या काळातील अंकामध्ये याचे सविस्तर वार्तांकन केलेले आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव राज्यात सर्वाधिक पुणे आणि मुंबईत झालेला जसा दिसतो. अशीच परिस्थिती त्या काळात सुद्धा होती. पुण्यात प्लेगची साथ ऑक्टोबर १८९६ मध्ये आली. नागरिकांना अचानक तीव्र ताप येत. उपचार करुन सुद्धा काहीच फायदा होत नसे. मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत होते. इंग्रज सरकार खडबडून जागे झाले होते.

पुण्यात या साथीला ग्रांथिक सन्निपात अथवा ब्यूबो निक प्लेग असे नाव होते. शहरातील झोपड्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांमध्ये याचा प्रादुर्भाव जास्त होता. ब्रिटिश सरकारने याकाळात नियमावली केली होती. रोगप्रतिबंधक उपाययोजनांमध्ये विलगीकरण, सार्वजनिक वाहतूक आणि गर्दीची ठिकाणे मोकळी करणे यांचा राबवल्या होता. ‘केसरी’च्या तत्कालीन अंकात क्वारंटाईन हा शब्दप्रयोग वापरला गेल्याचे आढळले.सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना रोगावर लस संशोधनाचे काम सुरु आहे. देशातील अनेक कंपन्या औषधाच्या शोधात लागल्या आहेत. प्लेगची साथ रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर संशोधन केले जात होते. कोरोना आणि प्लेगच्या साथीमधील साम्य यामधून अधोरेखित होत आहे.

‘केसरी’च्या ५ सप्टेंबर १८९९च्या अंकात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे, पुणे शहराची स्थिती किती भयंकर झाली आहे हे प्रत्यक्ष पाहिल्यावाचून कोणाच्याही लक्षात येणार नाही. दररोज १५० ते २०० बळी जात आहेत. मृत्यूचा आकडा महिन्याभरात 5 हजारांवर गेला आहे. पुण्यातील बहुतेक लोक हे गावाबाहेर राहण्यास गेले आहेत. ज्यांना बाहेर जाता येत नाही, रोजगार धंदा नसल्यामुळे पोटासही मिळण्याची मारामार हे लोक नाईलाजास्तव गावातच (पुण्यात) आहेत. प्लगेच्या साथीच्या प्रसार हा एका आळीतून पुढच्या आळीत; एका घरातून दुसर्‍या घरामध्ये वाढत होता. गावाबाहेर झोपड्या टाकून राहणे हे प्लेग टाळण्याचे एक साधन आहे. पण तसे करण्यास लोकांकडे साधने नाहीत. सरकार जर तसे साधन करुन देण्यास तयार नसेल तर निदान आम्हाला घरात तरी सुखाने मरु द्या.

प्लेगच्या काळातील आणि आताची शहरातील परिस्थिती एकसारखी आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. संपर्कातील व्यक्तींना कोरोनाची लागण होत आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत?आहे. शहरातून गावाकडे जाणार्‍यांची संख्या मोठी?आहे. मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पायपीट करत रस्त्याने जाणार्‍या मजुरांची संख्या मोठी असून त्यांचे हाल हृदयद्रावक आहेत. त्याकाळी सुध्दा नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आत्तासुध्दा अशीच परिस्थिती?आहे. प्लेगसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात?आले. स्वतंत्र?अधिकार्‍याची नेमणूक झाली. फंड, पॅकजची घोषणा झाल्या. यासर्वांची पुनरावृत्ती पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. शहराच्या ठराविक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने दिसत आहे. फरक इतकाच आहे की, त्यावेळी पुणे एका मोठ्या गावासारखे होते आता 35 लाख लोकसंख्या?असणारे मोठे शहर आहे. त्यामुळे धोका अधिकच वाढला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा