सोलापूर, (प्रतिनिधी) : गडचिरोली येथील भामरागड तालुक्यातील पोरयकोटी – कोरपर्शी जंगलात रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत क्युआरटी पथकाचे एक पोलिस उपनिरीक्षक आणि एक सी -६० पथकाचा जवान हुतात्मा झाला आहे. या घटनेत ३ जवान जखमी झाले आहेत. हुतात्मा झालेल्या जवानांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पुळूज गावचे रहिवासी पोलीस उपनिरीक्षक धनंजय तानाजी होनमाने (वय २६) यांचा समावेश आहे.

रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नक्षल्यांविरूध्द शोधमोहिम राबविताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार केला. यामध्ये प्रत्युत्तर देत असताना पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमाने व पोलीस जवान किशोर आत्राम हुतात्मा झाले. पोलीस उपनिरीक्षक होनमाने हे सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील रहिवासी आहेत. धनाजी होनमाने हुतात्मा झाल्याचे समजताच पुळूज गावावर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे या चकमकीत एकही नक्षली ठार झाला नाही. जखमी जवानांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा