नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊनचा कालावधी आणखी चौदा दिवसांनी वाढवला आहे. यामुळे आता ३१ मे पर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे.आजपासून (सोमवार) लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जाहीर केली असून लॉकडाऊन ४.० मध्ये मेट्रो, रेल्वे, विमानसेवा तसेच शाळा, महाविद्यालये, चित्रपट गृह, प्रार्थनास्थळे बंदच राहणार आहेत. तसेच राजकीय कार्यक्रमांवरील बंदी कायम राहणार आहे.

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्याचा कालावधी काल संपला. निर्बंध शिथिल होणार का? याकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले होते. परंतु देशात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता, आणखी काही काळ निर्बंध कायम असणार आहेत. याबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. तत्पूर्वी, महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब व मिझोरम या राज्यांनीदेखील ३१ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला होता.

केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी ७ आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार. नागरिकांना बाहेर येण्या-जाण्याची सूट असणार नाही. झोनप्रमाणे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि स्वातंत्र्य राज्यांना देण्यात आले आहे. पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत अनेक राज्यांनी याबाबतची मागणी केली होती. यामुळे आता राज्यांना कोरोनाच्या रुग्णसंख्येनुसार लाल, नारंगी व हिरवा असे झोन ठरवता येणार आहेत. केंद्राच्या नियमावलींची दखल घेऊन याबाबतचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांना घेता येईल. लाल क्षेत्र, व प्रतिबंधित भाग वगळून राज्यांना एकमेकांच्या अनुमतीने आंतरराज्य सेवा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच खेळाची मैदाने सुरू करण्याबाबत काही निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी प्रेक्षकांसाठी मैदाने व स्टेडियम बंदच राहणार आहेत. सरकारी कार्यालये आणि तेथील उपहारगृहे सुरू होणार आहेत.

हे राहणार बंद

आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा
मेट्रो सेवा
शैक्षणिक संस्था
हॉटेल, रेस्टारंट
चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, जीम, पूल, पार्क, बार
सामाजिक, धार्मिक कार्यक्रम
सर्व प्रार्थनास्थळे

हे होणार सुरू

ऑनलाइन शिकवणी
स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम
सरावासाठी मैदाने सुरु
सरकारी कार्यालये
सरकारी उपहारगृहे
बस किंवा इतर वाहनांमधून प्रवाशांच्या आतंरराज्य प्रवासाला परवानगी

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा