मुंबई, (प्रतिनिधी) : विविध उपाययोजना करूनही राज्यातील कोरोनाचा आकडा वाढतच चालला आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात जवळपास 1495 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे रुग्णांची एकूण संख्या 25 हजार 922 झाली आहे. बुधवारी दिवसभरात 54 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या 975 झाली आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत आला तरी कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी व्हायला तयार नाही. काल सलग सातव्या दिवशी 1 हजाराहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली. किंबहुना हा आकडा 1495 म्हणजेच दीड हजाराच्या घरात गेला. यातील 800 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईतील रुग्णांचा आकडा 15,747 झाला असून, मृतांची संख्या 596 झाली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा