सोलापूर, (प्रतिनिधी) : सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या बुधवारी 31 ने वाढून 308 इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या 2 ने वाढून 21 वर पोहोचली आहे. आत्तापर्यंत 3502 जणांची कोरोना स्वॅब चाचणी घेण्यात आली. यापैकी 3360 अहवाल प्राप्त झाले. यात 3052 निगेटिव्ह, तर 308 पॉझिटिव्ह आहेत.

बुधवारी एका दिवसात 129 अहवाल प्राप्त झाले यात 98 निगेटिव्ह तर 31 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 15 पुरूष आणि 16 महिलांचा समावेश आहे. मृत पावलेल्यांमध्ये 60 वर्षीय व्यक्ती गुरूनानक नगर परिसरातील पुरूष आहे. 11 मे रोजी सायंकाळी या व्यक्तीचा मृत्यू झाला; तर दुसरी व्यक्ती इंदिरा वसाहत भवानी पेठ येथील 72 वर्षीय पुरूष आहे. या व्यक्तीचा मृत्यू 12 मे रोजी झाला. बुधवारी मिळालेले रूग्ण साईबाबा चौक 2 पुरूष, 4 महिला, लष्कर सदर बझार 1 पुरूष, 1 महिला, शास्त्री नगर 2 पुरूष, 2 महिला, नवनाथ नगर 1 महिला,भारतरत्न इंदिरानगर 3 पुरूष, 4 महिला, रामलिंग नगर 1 पुरूष, कुमारस्वामी नगर 1 महिला, बेगमपेठ 1 पुरूष, केशव नगर 1 पुरूष, गवळी वस्ती जुना कुंभारी रोड 1 पुरूष, जुळे सोलापूर 1 पुरूष, एकता नगर 1 पुरूष,
इंदिरा वसाहत भवानी पेठ 1 पुरूष, पोलीस मुख्यालय 1 महिला, रंगभवन 1 महिला, रविवार पेठ 1 महिला आहे. आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 308 मध्ये 173 पुरूष तर 135 महिलांचा समावेश आहे. तर मृत 21 पैकी 11 पुरूष आणि 10 महिलांचा समावेश आहे. रूग्णालयातून बरे होऊन गेलेल्यांची संख्या 84 असून यात 55 पुरूष तर 29 महिलांचा समावेश आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा