सोलापूर : शेततळ्याचे काम सुरू असताना पोकलेन ट्रॅक्टर वर कोसळून झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अनवली (ता.पंढरपूर) येथे घडली. शशिकांत शिवाजी शिंदे (३०) रा.अनवली असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे.अनवली येथील प्रकाश शिंदे यांच्या शेतात शेततळ्याचे काम सुरु होते.बुधवारी सकाळी मातीच्या ढिगार्‍यावर पोकलेन च्या साह्याने डम्पिंग ट्रेलर मध्ये माती टाकण्याचे काम सुरू होते. या दरम्‍यान पोकलेन माती ढिगाऱ्यावरून घसरून ट्रॅक्टरवर कोसळले. यामध्ये ट्रॅक्टर चालवत असलेल्या शशिकांत शिवाजी शिंदे हा जागीच ठार झाला. शशिकांत शिंदे याने दोनच दिवसांपूर्वी ट्रॅक्‍टर खरेदी केला होता. अचानक घडलेल्या घटनेमुळे अनवली परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा