सोलापूर : सोलापुरात कोरोनामुळे मंगळवारी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. शहरात कोरोनाने आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला असून, रुग्णसंख्या २७७ वर पोहोचली आहे. काल १३३ अहवाल प्राप्त झाले. ज्यामध्ये १३१ निगेटिव्ह, तर २ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. २११ अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, काल ३१रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल होटगी रोड येथील आसरा सोसायटी आणि शिक्षक सोसायटीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला. सध्या १८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा