सोलापूर : एका महिलेने अज्ञात कारणावरुन आपल्या दोन लहान मुलांसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवार १२ मे रोजी रात्री भोयरे (ता.मोहोळ) येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे भोयरे येथील विकास भाऊराव साठे यांचे शेतातील विहिरीत स्वाती कैलास साठे (वय ३०) या महिलेने आपल्या अभिजीत कैलास साठे (वय ६), परी कैलास साठे (वय ४ वर्ष ) या दोन चिमुकल्यांसह विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

या घटनेबाबत भोयरेचे पोलीस पाटील नागेश काकासाहेब पाटील यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून अज्ञात कारणावरून एका महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची नोंद पोलिस ठाण्यात केली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल पोपळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर महिलेचा व मुलीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला,परंतु दुपारपर्यंत मुलाचा मृतदेह अद्याप हाती लागलेला नव्हता पोलिसांचे शोधकार्य सुरू आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा