मृतांचा वाढता आकडा सोलापूरसाठी धोक्याची घंटा

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना संक्रमितांच्या संख्येसोबतच मृतांचा वाढणारा आकडा सोलापूरकरांसाठी धोक्याची घंटा वाजवणारा आहे. महापालिका, पोलिस, जिल्हा प्रशासनानेच सर्व काही करावे या मानसिकतेत असलेल्या सोलापूरकरांनी आता स्वत:च स्वत:चे रक्षक होण्याची वेळ आली आहे. अन्यथा सोलापूरचे ईटली, अमेरिका होण्यास वेळ लागणार नाही.

सध्या आढळत असलेले बाधित दाट लोकवस्तीतील, झोपडपट्टी परिसरातील आहेत. ज्या लोकांना अजूनही कोरोनाच्या प्रसाराबद्दलची माहिती नाही, जाणीव नाही अशा भागातच कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे या परिसरातील बाधितांसह मृतांची संख्याही वाढते आहे. ग्रीन झोन असलेल्या सोलापूरने काही दिवसातच रेड झोनमध्ये प्रवेश केला आणि १० मे पर्यंत २६४ कोरोनाग्रस्त आढळले तर १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.यामध्ये ६ पुरुष तर ८ महिलांचा समावेश आहे.

पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बारा एप्रिल रोजी मिळाला आणि त्याचा मृत्यूही झाला. पाच्छा पेठ परिसरात राहणार्‍या ५६ वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. १० एप्रिल रोजी तो घराच्या परिसरातीलच एका खासगी रुग्णालयात प्रथम उपचारासाठी गेला होता. तिथून त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर ११ एप्रिल रोजी पहाटे उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. त्याचा स्वॅब घेतले होते. मात्र त्याचा अहवाल १२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी प्राप्त झाला त्यात तो रुग्ण बाधित असल्याचं निष्पन्न झाले होते.

१५ एप्रिल रोजी एका पुरूषाचा मृत्यू झाला होता. १७ एप्रिल रोजी सोलापुरात १२ बाधित रुग्ण आढळले होते यापैकी एकाचा मृत्यू तर अकरा जणांवर
उपचार सुरू होते. १९ एप्रिल रोजी दिलेल्या माहितीनुसार भारतरत्न इंदिरा नगर परिसरातील एका ६९ वर्षे वयाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर एका पुरुषाचा याच दिवशी मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली होती.

एका महिलेस २० एप्रिल रोजी बापूजी नगर भागातून ’सारी’ चा त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिचा २४ एप्रिल रोजी मृत्यू झाला.२१ एप्रिल रोजी तिघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती. २४ एप्रिल रोजी एका ५७ वर्ष वयाच्या महिलेस उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सारी या आजाराने २५ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली होती.

२६ एप्रिल रोजी कोव्हीड पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला होता. २८ एप्रिल रोजी मयत झालेली व्यक्ती ही ७६ वर्षाचा पुरुष होता. त्यांना २६ एप्रिल रोजी त्यांना सकाळी दहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान २८ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आणि त्यांचा पॉझिटिव रिपोर्ट हा २८ एप्रिल रोजी सकाळी आला होता .बाधित झालेली मयत व्यक्ती यापूर्वी पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील होती.

मोहोळ तालुक्यातील पाटकुल परिसरातील एक २६ वर्षीय महिला २४ एप्रिल रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आली होती. त्यांची टेस्ट २६ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आली होती. परंतु उपचारा दरम्यान ३ मे रोजी रात्री अकरा वाजता त्यांचे निधन झाले. त्याच दिवशी आणखी एका महिलेचे निधन झालं असल्याचं सांगण्यात आलं. न्यू पाच्छा पेठ परिसरातील ६५ वर्षाची एक महिला तीन मे रोजी दुपारी बाराच्या दरम्यान गंभीर अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केली होती.

उपचारा दरम्यान एका तासामध्ये तीन मे रोजी दुपारी एक वाजता त्यांचे निधन झाले त्यांचा पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट ४ मे रोजी सकाळी मिळाला.३ मे रोजी रात्री उशिरा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एका महिलेस उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ६३ वर्षांच्या होत्या.तसेच उत्तर सदर बझार,लष्कर परिसर येथे राहण्यास होत्या. उपचारा दरम्यान ४ मे रोजी पहाटे पावणे पाचच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह अहवाल ५ मे ला आला.

६ मे रोजी एक रुग्ण मयत असल्याची माहिती देण्यात आली. तो एकता नगर परिसरातील ५७ वर्षीय पुरुष होता .४ मे रोजी सायंकाळी तो सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गंभीर अवस्थेत दाखल केला होता. उपचार सुरू असताना ५ मे रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.त्यांचा बुधवारी ६ मे ला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला.

सात मे रोजी मिळालेल्या माहितीनुसार एक ४८ वर्षाची महिला जी न्यू पाच्छा पेठ परिसरात राहत होते. त्यांना सहा मे रोजी पहाटे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गंभीर अवस्थेत दाखल केले होते उपचारा दरम्यान सहा मे रोजी दुपारी तीन वाजता निधन झाले त्यांचा अहवाल सात मे रोजी पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी आठ मे रोजी शास्त्रीनगर परिसरातील एका महिलेचा मृत्यू झाला होता २५ एप्रिल रोजी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते २६ मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव आला उपचारादरम्यान आठ मे रोजी पहाटे निधन झाले. याच दिवशी एका ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला त्यांना पाच मे रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान पहाटे दोन वाजता ही व्यक्ती मरण पावली.यांचा सात मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

शनिवारी ९ मे रोजी दिलेल्या माहितीनुसार मयत झालेली एक व्यक्ती अशोक चौक परिसरातील एक ४८ वर्षाची महिला होती .८ मे रोजी तिला सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्याच दिवशी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कोव्हीड-१९ चा रिपोर्ट मिळाला असून तो पॉझिटिव्ह आहे.

एकंदरीत ग्रीन झोन मधून वेगाने रेड झोन कडे गेलेलं आपलं शहर पुन्हा त्याच वेगाने ग्रीन करायचं असेल तर आपणच आपले रक्षक बनावं लागेल.जिल्हा प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक,पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले तरच पुन्हा सोलापूर पूर्वपदावर येईल अन्यथा हकनाक बळी जातील.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा