डॉ. बाबा आढाव यांची टीका; ही तर मजुरांसाठी अघोषित आणीबाणी

पुणे : कोरोनामुळे लाखो मजुरांचा रोजगार थांबला आहे.अन्न आणि पैशाअभावी कष्टकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. घरात थांबून जगणे अशक्य होत आहे. त्यामुळे केवळ गरज म्हणून तो बाहेर पडत आहे. त्यांच्यासाठी ही एक प्रकारची अघोषित आणीबाणीच आहे. धास्तावलेले मजूर जीव मुठीत घेवून हजारो कि.मी.च्या पायी प्रवासास निघाले आहेत. कठीण काळात प्रशासन मात्र मजुरांत विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरले आहे. अशी टीका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली.

डॉ. आढाव म्हणाले, प्रारंभापासूनच कोरोना विषाणूच्या संकटाखाली कामगार पिचत असताना त्यांच्यासाठी म्हणून प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी लढा सुरू असताना दुसरीकडे मात्र कामगार जगण्याची लढाई लढत होते. त्यामुळेच कष्टकर्‍यांचा प्रशासनावरचा विश्वास उडाला आहे. मरायचेच आहे, तर आपल्या घरी जावून सन्मानाने मरू या भावनेने परराज्यातील कामगार प्रशासनाकडून कसलीच अपेक्षा न करता थेट पायी आपापल्या गावाकडे निघाले आहेत. मजुरांचे हाल मन सुन्न करणारे आहेत. तरी प्रशासन त्यांच्यासाठी काही ठोस करताना दिसत नसल्याची खंतही डॉ. आढाव यांनी व्यक्त केली.

मजुरांसाठी शासन आणि प्रशासनाने योग्य नियोजन करायला हवे होते. त्यांना कष्टकर्‍यांचे नियोजन करता येणार नसेल, तर प्रशासनाने ज्या मजुराला गावी जायचे आहे त्याची एसटी अथवा रेल्वेने व्यवस्था केली पाहिजे. ज्या राज्यातील मजूर आहेत त्या राज्यानेही त्यांना सहजतेने स्वीकारले पाहिजे. पुण्यासह राज्यात सर्वत्र भितीचे वातावरण आहे. त्यामुळे मजूर स्वत:ला असुरक्षित मानत आहेत. त्याच भितीपोटी आता मजूर इथे थांबण्याच्या मनस्थितीत नाहीत. कुटुंबासह प्रवासाला निघालेल्या मजुरांचे अन्न, पाण्याविना प्रचंड हाल होत आहेत. स्थलांतराचे दृश्य मानवतेला काळीमा फासणारे असल्याची टीकाही डॉ. आढाव यांनी केली.

आपण अघोषित युद्ध लढतोय

युद्धाच्या प्रसंगात समोर व्यक्ती किंवा देश असतो. मात्र या वेळीच्या युद्धात समोर डोळ्याला न दिसणारा विषाणू आहे. त्याच्या विरोधात आपण अघोषित युद्ध लढत आहोत. हे संकट केवळ राज्यावर नव्हे, तर जगावर आहे. ही बाब समजून घेवून प्रत्येकाने योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. विषाणू विरोधातली लढाई जिंकण्यासाठी नागरिकांनी शासन आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे. पंतप्रधान आणि प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकोप्याच्या भावनेने कठोर निर्णय घेवून कोरोना विषाणूला हरविले पाहिजे, अशी भावनाही डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

एक प्रतिक्रिया

 1. Gujarat Govt action to screen super spreaders
  and Digital cash payment is appreciated–
  ——————————————————-
  Once it is established that Corona Virus gets spread by Super spreaders
  Gujarat Govt has decided to screen super spreaders every week .
  Similarly ,even cash Transactions are stopped ,and digital payment system
  is introduced.

  Home Delivery staff are issued passes, they shall have to put on mask ,Hand
  Gloves and keep with them sanitizer,

  Hope other State Government shall follow so to protect lives of Public ,control
  spread of Corona Virus. This is called effective administration

  Jagdip H Vaishnav
  Mumbai

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा