पुणे : महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असा नावलौकिक असणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११४व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द केले आहेत अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा जोशी म्हणाले, प्रतिवर्षी २६ आणि २७ मे रोजी परिषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. २६मे रोजी विशेष ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्काराचे वितरण होते तर २७मे रोजी मसाप जीवनगौरव ,डॉ भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार आणि मसाप उत्कृष्ट शाखा व कार्यकर्ता पुरस्कार प्रदान केले जातात. हे दोन्ही कार्यक्रम लेखकांबरोबरच साहित्य रसिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात.कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे.

या वर्षीच्या वर्धापन दिन समारंभाची तयारी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उत्साहात सुरू होती परिषदेने दिलेले निमंत्रण स्वीकारून प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अशोक वाजपेयी यांनी ११४ व्या वर्धापन दिन समारंभात पुरस्कार वितरण सोहळयासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे मान्य केले होते पण सद्य स्थितीत कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत परिषदेतर्फे कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार नाही तसेच परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह इतर संस्थांनाही कार्यक्रमासाठी देण्यात येणार नाही.

कोरोनाच्या या विश्वव्यापी संकटाचे सर्वच क्षेत्रावर दूरगामी परिणाम होणार आहेत. सांस्कृतिक क्षेत्रही त्याला अपवाद असणार नाही. येणारा काळ साहित्य क्षेत्राची सत्व परीक्षा पाहणारा आहे. या जीवघेण्या संकटात प्रथम माणूस टिकणे आणि तो पुन्हा उभा राहणे जास्त महत्वाचे आहे त्यालाच प्राधान्य दिले पाहिजे. सध्या माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे या संकटानंतर समाजाची बदललेली मानसिकता आणि प्राधान्यक्रम यांचा संवेदनशीलतेने विचार करून निर्णय घ्यावे लागतील.काळाची पावले ओळखून परिषद योग्य ते निर्णय घेईल. प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करून मनातआशेचा दीप तेवत ठेवत या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही प्रा जोशी यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा