पुणे : राज्यात कोरोना विषाणूचे संकट आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी शासन आणि प्रशासनातर्फे विविध उपाय केले जात आहेत. कोरोना विषाणूला हरविण्यासाठी गर्दी टाळणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. लॉकडाऊनमुळे कोणालाच घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाने (एसटी) स्मार्ट कार्डला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 27 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रवाशांना आगारात येऊन स्मार्ट कार्ड घेणे शक्य नाही. तसेच त्यासंबंधीची माहिती आगारात येऊन प्रत्यक्ष देता येत नसल्याने सदर योजनेला 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला आहे. त्यामुळे ज्या भागात एसटी बसेस सुरू असतील त्या भागांमध्ये प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा