गरजवंतास मदतीचा हात आणि माणुसकीला घालू साद या उपक्रमा अंतर्गत पुरंदर तालुक्यातील गावांमध्ये एकूण १९० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप होता आहे. देशात गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे, आदिवासी कल्याण संस्था, उदयकाल फाऊंडेशन आणि केयर इंडिया यांच्या संस्थात्मक सामाजिक जबाबदारी अंतर्गत गरजवंतास देऊ मदतीचा हात आणि माणूसकीला घालू साद या उपक्रमांतर्गत पुरंदर तालुक्यातील मौजे काळदरी,देवडी,कोडकेवाडी आणि नारगेवाडी या गावांमध्ये जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या सर्व गावांतील लोकांना दररोज रोजंदारीने कामावर जावे लागते जवळपास मागच्या दिड महिन्यापासून देशभरात लॉक डाऊन असल्याने लोकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे या गावांतील लोकांना रोजच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. याच अनुषंगाने सामजिक कार्यकर्ते आकाश भगत आणि सदर गावतील सरपंच यांनी समाजकार्य विभाग प्रमुख यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती अर्ज केला होता. याच विनंती अर्जाचा विचार करुन समाजकार्य विभागाने गरजवंतास देऊ मदतीचा हात आणि माणुसकीला घालू साद या उपक्रमा अंतर्गत मदत करण्याचे ठरवले आणि महाराष्ट्र राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्य करत असलेल्या विविध सी एस आर कंपन्यास प्रस्ताव लिहून सादर केले. त्यापैकी उदयकाळ फाऊंडेशन आणि केयर इंडिया पुणे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले.याच अनुषंगाने सदर गावतील १९० कुटूंबाना जीवनावश्यक साहित्याचे किट वाटप केले.

सदर किट वाटप करताना केंद्र तसेच राज्य शासनाने दिलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले आहे. या किट मध्ये प्रमुख्याने ५ किलो गहू, १० किलो तांदूळ, १ किलो मूगडाळ, १ किलो तूरडाळ, १ किलो गोड तेल, १ किलो मीठ, १ किलो साखर इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.
याकरिता आकाश भगत (आदिवासी कल्याण संस्था पुणे), उदयकाळ फाऊंडेशन पुणे तसेच केयर इंडिया पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

त्याचबरोबर समाजकार्य विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रकाश यादव यांनी सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजन केले. सदर उपक्रमात विद्यार्थी समाज कार्यकर्ते पवन चौधरे आणि हणमंत श्रीरसागर यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच अविनाश ठोंबरे (अध्यक्ष आदिवासी विकास संस्था पुणे), मयुर बागुल ( उदयकाळ फाऊंडेशन) दिलीप खामकर , मंडळ अधिकारी गवारे साहेब चंद्रकांत यादव यांचे मोलाचे योगदान आणि सहकार्य लाभले..या सगळ्यांचे मन: पूर्वक धन्यवाद!

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा