मुंबई, (प्रतिनिधी) : लॉकडाउन उठवितानाचा राज्य सरकारची नेमकी योजना काय आहे हे सरकारने आधीच जाहीर करावे. अनेक कंटेन्मेंट भागांमध्ये पोलिसांना गृहीत धरून गर्दी होत आहे. अशा ठिकाणी सरळ राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात. राज्यातील परप्रांतीय मजूर बाहेर पडत आहेत त्यामुळे कारखान्यांमध्ये ज्या रिकाम्या जागा आहेत त्यांची माहिती महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा