पुणे : शहरावर कोरोनाचे संकट असताना भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री निधीला मदत न करता पंतप्रधान निधीला मार्च महिन्याचे मानधन दिले. या संदर्भातील पत्र सभागृह नेते धीरज घाटे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. एककीकडे महापालिका आयुक्त सीएसआरमधून कंपन्यांची मदत घेताना भाजपने थेट पंतप्रधान निधीला मदत केल्याने आता टिकेची झोड उठली.

राज्य आणि केंद्रशासन कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. लॉकडाऊनमुळे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. महापालिकेचे उत्पन्न घटल्याने महापालिका आयुक्त कोरोनाच्या उपचारासाठी सीएसआर फंडातून महापालिकेला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बऱ्याच कंपन्यांनी महापालिकेला मदत केली आहे. राज्यशासनाने सुध्दा मदतीचे आवाहन केले आहे. असे असताना स्थानिकांचा विचार न करता थेट पंतप्रधान निधीला मदत करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिकेला, अथवा राज्य सरकारच्या निधीला मदत करण्यापेक्षा भाजपच्या नगरसेवकांना आणि स्थानिक नेत्यांना थेट पंतप्रधान निधीला मदत करणे योग्य वाटले आहे. पालिकेत भाजपचे १०२ नगरसेवक आहेत , त्यानुसार २० लाख ४० हजार इतके मानधन जमा होणार आहे.

कोरोनामध्ये सुध्दा राजकारण सुचते

पुणे महापालिका सीएसआर फंडासाठी हात पसरत आहे, अशा परिस्थितीमध्ये पुणेकरांचा पैसा पंतप्रधान निधीला देण्यात येणार आहे. पैसे पंतप्रधान फंडाला देण्यामागे सुध्दा भाजपचे राजकारण आहे.

चेतन तुपे (आमदार हडपसर)

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा