पुणे : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या ठिकाणी मध्ये निर्मिती आणि विक्री सुरू करण्यास अटी व शर्तीसह परवानगी दिलेली आहे.

राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी मद्यविक्रीच्या दुकानाबाबत एकत्रित मार्गदर्शक तत्वे व निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मद्य तयार करणारे कारखाने घाऊक आणि किरकोळ विक्रेते यांबाबत रविवारी निर्णय घेतला होता. परंतु, पुणे जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण जास्त असल्याने जिल्हा प्रशासनाने निर्णय राखीव ठेऊन मद्य विक्री केंद्र सुरू करण्यास मज्जाव केला होता.

आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे, महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, ग्रामीण पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त आणि महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष राम यांनी पुणे शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील परिसर वगळता ग्रामीण भागात आणि इतर ठिकाणी मद्य विक्री आणि उत्पादन करण्यास अटी शर्तीनुसार परवानगी दिली आहे.

कोरोना विषाणुंचा संसर्ग व प्रार्दुभाव लक्षात घेता ज्या ठिकाणी मद्याचे उत्पादन होते अशा आस्थापनांमध्ये ५० टककटपेक्षा कमी कामगार राहतील. या कामगारांची थर्मल स्कॅनिंग, सर्दी, खोकला व ताप याची तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच शहरी भागातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) वगळून इतर क्षेत्रातील घाऊक आणि मद्य विक्रेत्यांचे व्यवहार सुरू करण्यात येणार असून सायंकाळी ५ नंतर विक्रीस मज्जाव केला आहे. शहरी भागातील सर्व प्रकारची स्वतंत्र किरकोळ मद्यविक्रीची दुकाने, कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील मद्य विक्री केंद्रे सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

सद्य स्थितीला पुणे शहरात भवानी पेठ, कसबा-विश्रामबागवाडा, ढोले पाटील, येरवडा-विश्रांतवाडी आणि शिवाजीनगर-घोले रस्ता या महापालिकेच्या पाच क्षेत्रीय कार्यालयांची हद्द प्रतिबंधित क्षेत्र (कंटेंटमेंट झोन) आहे. हा परिसर वगळता इतर ठिकाणी मद्यालये सुरू करण्यात आली असून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिक हद्दीच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. जेणे करून मद्य विक्री दुकानांवर गर्दी होणार नाही.

मद्यपींसाठी हे आहेत नियम

मद्यविक्री करणाऱ्या दुकानांसामोर पाचपेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नयेत. दोन ग्राहकांमध्ये किमान ६ फुट अंतर असणे अनिवार्य राहील. त्याकरिता दुकानासमोर प्रत्येक सहा फुटावर वर्तुळ आखणे बंधनकारक राहील. मद्य विक्री ठिकाणीं किंवा मद्यालयत मद्य सेवन करता येणार नाही. मद्य वाहतूक परवाना आवश्यक असेल. खरेदी विक्रीचा भंग होणार नाही याचे पालन करावे. किरकोळ मद्यविक्री दुकानाच्या प्रवेशद्वारावर भागात फलक लावण्यात यावा. सोशल डिस्टसिंग व मास्कचा वापर अनिवार्य असेल असे निर्देश दिले असून याचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बंद वाईन शॉप बाहेर एक किलो मीटरपर्यंत रांगा

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा