पुणे : मेट्रोची ट्रायल रन झाल्यानंतर येत्या जूनअखेर वनाज-रामवाडी या मेट्रोमार्गावर आयडीयल कॉलनी ते गरवारे महाविद्यालय या दरम्यान सेवा सुरू करण्याची घोषणा महामेट्रो प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे प्रशासनाने पुणेकरांना दाखवलेले जूनमधील मेट्रो प्रवासाचे स्वप्न लांबणीवर पडणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासासाठी दोन्ही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत आहे. वनाज ते रामवाडी, आणि पिंपरी ते स्वारगेट अशा दोन मेट्रो मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मेट्रोमार्गातील अनेक टप्प्यांमधील कामे पूर्ण तर काही पुर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. काही महिन्यापूर्वी ट्रेन दाखल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत ट्रायल रन घेण्यात आला.

त्यानंतर महामेट्रो प्रशासनाने वनाज-रामवाडी या मार्गावरील आयडीएल कॉलनी ते गरवारे महाविद्यालय या दरम्यानची आणि पिंपरी – स्वारगेट मार्गावर संत तुकारामनगर ते फुगेवाडी या दरम्यान जूनअखेरपर्यंत मेट्रो सुरू करण्याची घोषणा केली होती. शिवाय आरटीओ ते येरवडा या दरम्यान डिसेंबर 2020 पर्यंत मेट्रो सुरू होईल, असेही सांगितले. मात्र, गेल्या महिन्याभरात लॉकडाऊनमुळे काहीच काम होऊ शकले नाही. आता ही कामे पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मेट्रोतून सफर करण्याचे पुणेकरांचे स्वप्न लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
’महामेट्रो’कडे सध्या तात्पुरत्या स्वरूपात काम करण्यासाठी लोखंड, स्टील, सिमेंट आणि इतर पूरक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. मेट्रोचे काम गतीने करण्यासाठी या कच्च्या मालाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, सध्या सर्व जिल्ह्यांच्या आणि शेजारील राज्यांच्या सीमा बंद आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा