नवी दिल्ली : शेअर बाजारात बुधवारी सकारात्मक चित्र पहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी 6.98 टक्के म्हणजे 1861.75 अंकांच्या तेजीसह 28,535.78 अंकांवर स्थिरावला. राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 6.63 टक्के म्हणजे 533.17 अंकांच्या वाढीसह 8,694.95 अंकांवर बंद झाला.

मागच्या काही दिवसांपासून जगभर कोरोनाचे संकट उभे राहिले आहे. त्याचे विपरीत परिणाम जगभरातील शेअर बाजारावर पहायला मिळत आहे. काल बाजारत 174 अंकांच्या घसरणीसह 26499.81 अंकांवर उघडला. मात्र, काही वेळातच तो 27 हजारांवर पोहोचला. पुन्हा 125 अंकांच्या घसरणीसह काही वेळ व्यवहार केला. मात्र, दुपारनंतर पुन्हा तेजी पहायला मिळाली. तिकडे, निफ्टीदेखील 65.9 अंकांच्या तेजीसह 7,735.15 अंकांवर उघडला. त्यातही, पहिल्या सत्रात काही घसरण पहायला मिळाली. मात्र, त्यानंतर निफ्टीदेखील सावरला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा