सिडनी : ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक ब्रॅड हॅडिननेही पंतबाबत म्हटले होते की, ” पंत हा गुणी खेळाडू आहे. पण त्याने दुसऱ्याच कोणाची नक्कल न करता आपली स्वत:ची ओळख निर्माण करावी.” ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगला एका चाहत्याने प्रश्न विचारला होता. या प्रश्नावर हॉग म्हणाला की, ” मला तर पंतची फलंदाजी आवडते. तो जेव्हा खेळायला येतो तेव्हा मी टीव्ही लावतो. पंतकडे चांगली गुणवत्ता आहे, पण सध्याच्या घडीला त्याला मानसिक आधार देणाऱ्या प्रशिक्षकाची गरज आहे. त्यामुळे त्याला जर चांगला मानसिक आधार मिळाला तर तो नक्कीच चांगली कामगिरी करू शकतो.”

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा