पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या पहिल्या ३ रुग्णांचे १४ दिवसांनंतरचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. अर्थात हे रुग्ण बरे झाले आहेत. हे तिन्ही रुग्ण पुरुष असून त्यांचे १४ दिवसांनंतरचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आज गुरुवारी पुन्हा एकदा त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविणार आहेत. ते पुन्हा निगेटीव्ह आल्यास त्यांना रुग्णालयातून सोडणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.

दुबईहून ११ मार्च रोजी आलेल्या या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर काही दिवस शहरातील रुग्णांच्या संख्येत सातत्याने भर पडत होती. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाणार की काय असे वाटत होते. मात्र, महापालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या वाढली नाही. आता महापालिकेच्या रुग्णालयातून हे रुग्ण बरे होऊन घरी जाणार असल्याने नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या सहा संशयितांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा