काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये बुधवारी गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याच्यावेळी शीख समुदायातील अनेकजण प्रार्थनेसाठी जमले होते. यामध्ये 25 शीख व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या हल्लयाची जबाबदारी आयसीसने घेतली आहे. हा आत्मघाती हल्ला होता. यावेळी गुरूद्वारामध्ये शंभरहून अधिक लोक उपस्थित होते. मागील काही काळांमध्ये अफगाणिस्तानमधील शीख समुदायावर झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. यामध्ये 25 जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात धाव घेऊन प्रत्युत्तरात कारवाई केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा