पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांच्या घशाती द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविणे आणि रुग्णांवर उपचार करणे यासाठी शहरातील डॉ. डी.वाय.पाटील हॉस्पिटल- संत तुकारामनगर, आदित्य बिर्ला हॉस्पिटल-थेरगाव, निरामय हॉस्पिटल-चिंचवड, लोकमान्य हॉस्पिटल-निगडी, लोकमान्य हॉस्पिटल-‍ चिंचवड, स्टर्लिंग हॉस्पिटल-प्राधिकरण, ऍकॉर्ड (जुने संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल) हॉस्पिटल-स्पाईन रोड मोशी) या रुग्णालयांना राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

आजवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नविन भोसरी रुग्णालयामध्येच कोरोना बाधित, संशयित रुग्णांना ठेवले जात होते. याच रुग्णालयातून कोरोनासाठी घश्यातील द्रव्यांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविले जात होते. परंतु शहरात संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यास या रुग्णालयांवर ताण येऊ शकतो याचा विचार करून वरील सात रुग्णालयांना शासनाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा