पिंपरी : कोरोना विषाणूमुळे सर्व मोठे उद्योग बंद असल्याने औद्योगिक कंपन्यांना महावितरणाने वीज बिलांमध्ये सरकारने सवलत जाहीर करावी अशी मागणी ‘फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’चे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केली आहे.

बऱ्याच कंपन्यांना कामगार वर्गाला किमान वेतन द्यावे लागणार आहे त्यात सध्याची कोरोना विषाणूमुळे औद्योगिक परिस्थिती पाहता बऱ्याच कंपन्यांची उत्पादने बंद आहेत. बरीच देणी उद्योजकांना द्यावी लागतात त्यामध्ये सरकारने पुढाकार घेऊन उद्योग क्षेत्र जगविण्यासाठी तातडीने वीज बिलामध्ये जे इतर शुल्क लावले जातात. त्यामध्ये सूट देऊन उद्योजकांवर थोडा भार कमी केल्यास नक्कीच उद्योजकांना परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आधार मिळेल.

”सरकारने नुकतीच घरगुती बिलांमध्ये योजना जाहीर केली. सर्वसाधारण बिल परंतु कंपन्यांमध्ये उत्पादनच बंद असल्याने सर्वसाधारण बिल या संकल्पनेत उद्योग बसू शकत नाहीत. लहान उद्योगांना मोठ्या कंपन्यांकडून उत्पादने पुरवठा न झाल्यामुळे बिलेही उशिरा मिळणार आहेत. वीज बिल भरण्यासाठी हप्ता योजना जाहीर केल्यास थकबाकीदार कमी होतील,”असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा