श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्या पाठोपाठ आता त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांची सुटका झाली आहे. पीएसए कायद्यातंर्गत त्यांना अटक झाली होती. मागच्या २३२ दिवसांपासून ते नजरकैदेत होते. तर, फारूख अब्दुल्ला यांची १३ मार्च रोजी सुटका करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून ३७० वे कलम हटविल्यानंतर अब्दुल्ला पिता-पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून ते घरातच नजरकैदेत होते. फारुख अब्दुल्ला यांच्या कन्या सारा यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करतानाच जम्मू-काश्मीर प्रशासनानेकडे अब्दुल्ला पिता-पुत्रांची अद्याप सुटका का झाली नाही? त्यांची सुटका कधी होणार? असा सवाल केला होता. त्याशिवाय, काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवित त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. अब्दुल्ला पिता-पुत्रांची सुटका झाली तरी पीडीपीच्या प्रमुख आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती अद्याप अटकेत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा