फिरताना दिसल्यास होणार कारवाई

राहुरी : शहरातील शिक्षणासाठी नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी असलेले नागरिक गावाकडे म्हणजे तालुक्यात आले असून  ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये. यासाठी, बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या ११२७ जणांचा सर्वे तहसील खात्याने केला असून बाहेरून आलेल्या सर्व नागरिकांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ शिक्का मारला जाईल. त्यांनी चौदा दिवस घरात बसावे. बाहेर फिरू नये, अशी सक्त ताकीद दिलेली आहे.अशी माहिती तहसीलदार एफ आर शेख दिली.”.

शेख म्हणाले, “कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परंतु, त्यापूर्वी तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरच्या जिल्ह्यातून अनेक जण आले आहेत. पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद व इतर शहरांमध्ये कामा निमित्त स्थायिक झालेले व मूळचे राहुरी तालुक्यातील असलेले नागरिक तसेच पाहुणे म्हणून बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत. त्यांची नावे ग्रामसेवकांतर्फे रजिस्टर मध्ये नोंद करुन, त्यांच्या तब्येतीची नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली आहे. ११२७ जणांची आतापर्यंत तपासणी झाली आहे. त्या सर्वांची तब्येत चांगली आहे. त्यांना कोरोना विषाणूची कोणतीही लक्षणे नाहीत. तरी, त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ शिक्के मारले जातील. असे लोक बाहेर फिरतांना आढळले. तर नागरिकांनी त्यांना मज्जाव करावा. त्यांची नावे कळवावी. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.” जेणेकरून त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये. त्यांनी चौदा दिवस घरात बसावे. बाहेर फिरू नये, अशी सक्त ताकीद दिलेली आहे.

ज्या गावात बाहेरच्या जिल्ह्यातील पाहुणे आले. त्या गावातील नागरिकांनी पाहुण्यांशी सौजन्याने वागावे. शेजारी-पाजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांना माणुसकीने समजून घ्यावे. परंतु, बाहेरच्या पाहुण्यांनी ‘होम क्वारंटाईन’ शिक्का घेऊन गावभर फिरू नये. तसे आढळल्यास ग्रामस्थांनी त्यांना मज्जाव करावा. त्यांची माहिती तत्काळ प्रशासनाला कळवावी.” असेही ते म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा