मुंबई-ठाण्यात ६ नवीन रुग्ण

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाचे १२२ रुग्ण झाले आहेत. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून तपशील दिला.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ११६ वरून १२२ इतकी झाली आहे. सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना आज सकाळी संसर्गातून कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. त्यानंतर मुंबईत पाच नवीन रुग्ण आढळले आहेत तर ठाण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा