पिंपरी : संशयित कोरोनाग्रस्त म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी नवीन रुग्णालयात दाखल केलेल्या दहा रुग्णांना कोरोनाचे तपासणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यामुळे त्यांनासोडले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या बारा कोरोना बाधितांची प्रकृतीही स्थिर आहे. तसेच मागील पाच दिवसांपासून शहरात एकही कोरोना बाधित आढळलेला नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेसह सर्व शासकीय यंत्रणांनी वेळीच योग्य ती पावले उचलल्याने हे साध्य झाले आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नवीन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत १३४ व्यक्तींचे कोरोनाकरीता घश्यातील द्रवाचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविले. मंगळवारी पाठविलेल्या दहा जणांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, आज बुधवारी तीन संशयितांना महापालिका रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यांच्याही घश्यातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा