पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ तर्फे महापालिकेतील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोफत बस सेवा देण्यात येणार आहे. सकाळी साडे आठ ते साडे दहा सायंकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत दर ३० मिनिटांनी मोफत सेवा देणार आहे आहे. ओळखपत्र तपासूनच बस मध्ये प्रवेश मिळणार आहे.

कात्रज, बालेवाडी, पुणे स्थानक, हडपसर, न ता वाडी आणि स्वारगेट या सहा स्थानकातून बस सोडणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळता बंद केली आहे. सध्या नागरिकांसाठी अग्निशमन, पोलीस, स्वच्छता, आरोग्य विभागातील कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत.अशा कर्मचाऱ्याने बससेवा उपलब्ध करून देणार आहे.

कात्रज येथून सुटणारी बस स्वारगेट, बाजीराव रस्ता, मनपा, सिमला ऑफिस, आरटीओ, नायडू रुग्णालयात, पुणे स्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, शनिवार वाडा मंडई स्वारगेट परत कात्रज या मार्गावरील कर्मचाऱ्यांना सोडेल.

औंध ते डेक्कन, विमाननगर ते मनपा, भेकराई नगर ते मनपा, विश्रांतवाडी ते मनपा, नांदेड सिटी ते डेक्कन अशी पीएमपीची सेवा असणार आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा